आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती जशी वीज चमके गगनात जशी वीज चमके गगनात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात सरळ भांग, नीज भुजंग वेणी काजळ ल्याली नयनात सरळ भांग, नीज भुजंग वेणी काजळ ल्याली नयनात रत्नजडीत हार, कासे पितांबर रत्नजडीत हार, कासे पितांबर कंचुकी हिरवी अंगात कंचुकी हिरवी अंगात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात केशर कस्तुरी, मिश्रीत तांबुल लाल रंगला वदनात केशर कस्तुरी, मिश्रीत तांबुल लाल रंगला वदनात कंकण कनकाची खणखणती कंकण कनकाची खणखणती वाजती पैंजण पायात वाजती पैंजण पायात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात विष्णुदास म्हणे, विष्णुदास म्हणे अशी निरंतर दे आवडे, अशी निरंतर दे आवडे दे आवडी मज भजनात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती जशी वीज चमके गगनात आली आई भवानी स्वप्नात आली आई भवानी स्वप्नात