या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल हुंदक्यात या दाटून येते हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही