वाटा पुढे कीती विस्तारल्या दूर-दूर पाय झरझर गेले किती दूर-दूर वाटांनी या जरी, लांब नेले तरी मनातले खरे भरलेले दूर जाओ कुणी, मागे राहो कुणी मुक्त सारे तारे नभातले जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे बांधून ठेवले जे कुरवाळून करावे मोकळे सुख शोधताना पडल्या कमी दाही दिशा पंख सरसर झेपावले वर-वर जातांना जे काही गेले राहूनही आहे ते ही सारे जपलेले समजूत थोडीशी, थोडेसे सुख ही जुन्या जागी नवे फेरलेले जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे बांधून ठेवले जे कुरवाळून करावे मोकळे शहर छोटे-छोटे होत गेल्यासारखे परत आल्यावर सारे येथे आहे तसे हीच सावली इथे, उन्ह दारातले तसेच काहीसे जुने डोळ्यातले साचलेले स्वप्न एक ओघळले दूर काही ओळखीचे किनारे सुके पाणावले जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे कोमेजून गेलेले मुके डोळे करावे बोलके